दिवाळी मुहूर्तावर शेअर बाजारात पैसे गुंतवणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सणानिमित्त बाजारपेठेत दिवसभर व्यवसाय बंद असतो, मात्र सायंकाळी शेअर बाजार दिवाळीच्या मुहूर्तावर तासभर सुरू केला जातो.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी शेअर मार्केट मध्ये लोक स्टॉक खरेदी करतात, याला “मुहूर्त ट्रेडिंग” असे म्हणतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 24 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी शेअर बाजार एक तासासाठी खुला राहणार आहे. तुम्हीही या शुभ मुहूर्तावर शेअर्समध्ये गुंतवणूक करून दिवाळीची शुभ ट्रेडिंग करू शकता.
मुहूर्त ट्रेडिंगचा वेळापत्रक : 24 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज संध्याकाळी 6:15 ते 7:15 दरम्यान एक तासासाठी खुला राहील, यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. ब्लॉक डील ट्रेडिंग संध्याकाळी 5.45 ते 6.00 दरम्यान होईल. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6:08 या वेळेत होईल. या वर्षीच्या दिवाळी मुहूर्ताच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवाळीपासून हिंदू कॅलेंडर वर्षानुसार संवत 2079 ची सुरुवात देखील होईल. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, दिवाळीच्या मुहूर्तावर स्टॉक ट्रेडिंग केल्यास वर्षभर समृद्धी आणि संपत्ती वाढत राहते.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची निर्धारित वेळ :
- ब्लॉक डील सेशन : 5:45 PM ते 6 PM
*प्री-ओपन सेशन : 6 ते 6.08 PM - मार्केट ट्रेडिंग सेशन : 6.15 PM ते 7.15 PM
- कॉल ट्रेडिंग सेशन : 6.20 PM ते 7.5 PM
दिवाळी मुहूर्तावर कोणते स्टॉक घ्यावे? शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, दिवाळी मुहूर्तावर ट्रेडिंग केल्यास वर्षभर समृद्धी आणि संपत्ती वाढत राहते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार या शुभ सत्रात स्टॉक खरेदी करतात,आणि पैसे कमावतात.
ब्रोकरेज फर्म निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज रिसर्चने दिवाळी मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी काही स्टॉक निवडले आहेत. हे स्टॉक पुढील दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून शकतात.
लार्ज-कॅप स्पेसमधून :
1) ब्रिटानिया इंडस्ट्रीज लक्ष्य किंमत : 4,600 रुपये
2) सिप्ला फार्मा लक्ष्य किंमत : 1,268 रुपये
3) हीरो मोटोकॉर्प लक्ष्य किंमत : 3,161 रुपये
4) ICICI बँक लक्ष्य किंमत : 1,079 रुपये
5) अल्ट्राटेक सिमेंट लक्ष्य किंमत : 1,079 रुपये
6) अजंता फार्मा लक्ष्य किंमत : 1,491 रुपये
7) बाटा इंडिया लक्ष्य किंमत : 2,240 रुपये
8) सीसीएल उत्पादने लक्ष्य किंमत : 700 रुपये
9) फेडरल बँक लक्ष्य किंमत : 149 रुपये
10) जेके लक्ष्मी सिमेंट्स लक्ष्य किंमत : 149 रुपये
11) आयनॉक्स लीजर : 720 रुपये
12) ला ओपाला आरजी : 500 रुपये