Monday, July 7, 2025
Homeमनोरंजनसात वर्षांनंतर खुनाची कबुली? दृश्यम-2चा थरारक ट्रेलर रिलीज

सात वर्षांनंतर खुनाची कबुली? दृश्यम-2चा थरारक ट्रेलर रिलीज

अजय देवगण (Ajay Devgn) आणि श्रिया सरन (Shriya Saran) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम’ (Drishyam) हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची (Drishyam 2) आतुरतेने वाट पाहत होते. तुम्ही देखील हा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या सीक्वच्या पाहण्यास उत्सुक असाल तुमची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज (Drishyam 2 Official Trailer Out) करण्यात आला आहे.

दृश्यम 2015 मध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग दृश्यम-2 सात वर्षांनंतर यावर्षी आता नोव्हेंबर 2022 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज 17 ऑक्टोबर 2022 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आला. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटात अजय देवगणने साकरलेल्या विजय साळगावकरचे (Vijay Salgaonkar) प्रकरण उघड होत आहे. या प्रकरणाची चौकशी अक्षय खन्ना (Akshaye Khanna) करणार आहे.

विजय साळगावकर खुनाची कबुली देणार?
दृश्यम-2 चा ट्रेलर मागील भागाप्रमाणेच सस्पेन्सने भरलेला आहे. मागील चित्रपटात झालेल्या खुनाच्या मृतदेहाचा शोध सात वर्षांनंतरही सुरूच आहे. यादरम्यान अनेक ट्विस्ट आणि वळणं आले आहेत. हा चित्रपट देखील एक भावनिक रोलरकोस्टर आणि एक उत्तम थ्रिलर सस्पेन्सने भरलेला असेल अशी अपेक्षा आहे. ट्रेलरच्या शेवटी विजय साळगावकर पोलिसांसमोर कबुली देताना दिसत आहे. मात्र तो कबुलीजबाब काय आहे आणि त्यावर पोलिसांची प्रतिक्रिया काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

चित्रपटात अजय देवगणसोबत श्रिया सरन, अक्षय खन्ना, तब्बू, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. दुपारी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला आतापर्यंत 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दृश्यम-2 पुढील महिन्यात 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -