सांगली जिल्हयातील न उघडकीस आणलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयावर लक्ष केंद्रीत करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेत असताना, माहीती मिळाली की, सुभानअल्ला मुसा नदाफ व त्याची बायको मुबीना नदाफ रा. किसान चौक सांगली या दोघांनी कोठेतरी चोरी करुन आणलेले पैसे व सोन्याचे दागीने पिशवीत घेवुन ते बाहेर गावी चालले असुन सध्या ते शांतीबन चौक, इनाम धामणी, सिटी बस स्टॉप जवळ थांबले आहेत अशी माहिती मिळाली.
मिळाले बातमीप्रमाणे इनाम धामणी शांतीवन चौक, इनाम धामणी, सिटी बस स्टॉप पिक अप शेड जवळ बातमीप्रमाणे खात्री पटलेने पंचा समक्ष त्या दोघांना हातातील पिशवीसह ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांचे कडील पिशवी उघडुन पाहिली असता, त्या पिशवीमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागीने मिळुन आले. त्यावेळी त्यांचेकडे मिळुन आले पैसे व दागिन्याच्या मालकी हक्काबाबत, पावती तसेच ते कोठुन आणले, कोठे घेऊन चालला याबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता सुभानअल्ला नदाफ, मोबीना नदाफ यांनी सांगितले की, काही दिवसापुर्वी शेजारी राहणारे नातेवाईक युनुस नदाफ यांचे घराचे उघडे दरवाजातून आत जावुन कपाटातील रोख रक्कमेची चोरी करुन नेली होती. त्या चोरीतीलच काही रक्कम आता पिशवीमध्ये असुन सोन्याचे दागीने हे त्याच पैशातुन विकत घेतलेले आहेत असे सांगीतले. त्यावेळी त्याचे कब्जातील गुन्हयातील रोख ३ लाख ८५ हजार रुपये व १ लाख ३२ हजार ५००/- रुपयाचे चोरीच्या पैशातुन खरेदी केले एक सोन्याचा नेकलेस, सोन्याची कर्णफुले १ जोड असा एकुण ५ लख १७ हजार ५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल पुढील गुन्हयाचे तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.