Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजन'Dilwale Dulhania Le Jayenge' ला 27 वर्षे पूर्ण, 4 कोटींच्या चित्रपटाने केली...

‘Dilwale Dulhania Le Jayenge’ ला 27 वर्षे पूर्ण, 4 कोटींच्या चित्रपटाने केली होती 102 कोटींची कमाई!

बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली ओळख निर्माण करणे आणि एखादा चित्रपट सुपरहिट होणे खूपच अवघड काम असते. पण बऱ्याचदा रातोरात एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आणि चित्रपट सुपरहिट देखील झाले आहेत. असाच एक चित्रपट 27 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट त्याकाळामध्ये सुपरहिट ठरुन त्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) बक्कळ कमाई केली होती. हा चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge). 20 ऑक्टोबर 1995 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉलिवूडला वेगळी ओळख मिळवून दिली होती.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाला 27 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याच्याशीसंबंधित काही रंजक गोष्टी ज्या आपल्याला कोणलाच माहिती नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाने दमदार कमाई करत त्या काळमध्ये विक्रम केला होता. चार कोटींच्या बजेच्या या चित्रपटाने भारतामध्ये 89 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर परदेशात या चित्रपटाने 13.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशापद्धतीने या चित्रपटाने एकूण 102.50 कोटींची कमाई केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने केलेल्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाने भारतात 455 कोटी रुपयांची कमाई केली. तर इतर देशांमध्ये 69 कोटी रुपयांची कमाई केली होते. असे करुन आजपर्यंत या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 524 कोटी रुपये ऐवढी आहे.

या चित्रपटाने त्या काळामध्ये सर्व विक्रम तोडून टाकले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षक आवडीने हा चित्रपट आजही पाहाहताना दिसत आहे. या चित्रपटाला 1996 च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 14 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. त्यापैकी या चित्रपटाने 10 पुरस्कार आपल्या नावावर केले होते.

‘बिहाइंड द सीन’ दाखवणारा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. तर त्यांचा धाकटा भाऊ उदय चोप्रा हे या चित्रपटा सहाय्यक म्हणून काम केले होते. ज्यांना मेकिंग रेकॉर्डिंगची जबाबदारी देण्यात आली होती. उदय चोप्राने व्हिडिओग्राफर होत हा चित्रपट कॅमेऱ्यात कैद केला.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे नाव किरण खेर यांनी सुचवले होते. यशराज फिल्म्सने प्रकाशित केलेल्या ‘आदित्य चोप्रा लाइव्ह्स…दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या पुस्तकात स्वत: आदित्य चोप्रा यांनी याचा उल्लेख केला आहे. त्यांनी या पुस्तकात असे सांगितले आहे की, ‘किरणजींना 1974 च्या ‘चोर मचाये शोर’ या चित्रपटातील ‘ले जायेंगे…ले जायेंगे…दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे गाणे ऐकून ही कल्पना सुचली होती. त्यांनी मला चित्रपटाच्या नावाबद्दल सांगितले तेव्हा मला ही कल्पना खूप आवडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -