ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाच्या संसर्गानं आपली पाठ सोडली असं तुम्हाला वाटत असेल तर, तसं नाहीये. कारण, इतक्यात या महामारीपासून तुमची सुटका नाही. आतापर्यंत अनेक अहवालांमधून कोरोनासंदर्भातील अनेक दावे करण्यात आले आहेत. किंबहुना सध्या ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट संपूर्ण जगात फोफावत असल्याचं कळत आहे. यामध्येच वॉशिंग्टन विश्वविद्यालयाने एका विश्वेषणात कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा फेब्रुवारीपर्यंत वाढून जवळपास 18.7 मिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या हा आकडा 16.7 मिलियन इतका आहे. थोडक्यात कोरोना रुग्णांची पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
हिवाळ्यात अधिक सावध व्हा….
अहवालानुसार आधीच्या हिवाळ्यांपेक्षा सध्याची सरासकी कमी आहे. 2022 च्या जानेवारी महिन्यात ओमायक्रॉन अतिप्रचंड वेगाने पसरल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली, पण ती धोक्याच्या बातळीपर्यंत पोहोचली नव्हती. असं असलं तरीही यंदाच्या हिवाळ्यात मात्र सतर्क राहण्याची गरज आहे.
जर्मनी आणि सिंगापूरमध्ये कोरोना वेगानं पसरतोय…
येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत वैश्विक पातळीवर कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा सरासरी आकडा 2748 इतका असेल. सध्या हा आकडा 1660 इतका आहे. जर्मनीमध्ये सध्या कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सध्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचे रुग्ण इथे दिसत आहेत. ही लाट आता युरोपच्या इतर भागांमध्येही पाहिली जाऊ शकते.
सिंगापूरमध्येही कोरोनाच्या XBB सब व्हेरिएंटचा फैलाव अतिशय वेगानं होण्यास सुरुवात झाली आहे. दर दिवशी इथे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. जागतिक स्तरावरील ही आकडेवारी पाहता कोरोना पुन्हा संपूर्ण जगाला विळख्यात घेतोय हीच भीती आरोग्य संघटनंनी व्यक्त केली आहे.