सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर सोबत ‘विरासत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा बत्रा आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री पूजा बत्रा हिचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे 27 ऑक्टोबर 1976 झाला. पूजा बत्राचे बॉलिवूड करिअर पाहिजे तितकं यशस्वी ठरलं नसलं तरी ती खासगी आयुष्यात कायम चर्चेत राहिली आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया पूजा बत्रा हिच्याविषयी काही रंजक किस्से…
अक्षय कुमारमुळे झाला होता घटस्फोट
अभिनेत्री पूजा बत्रा ही इतर बॉलिवूड स्टार्सप्रमाणे खासगी आयुष्यात अनेकदा चर्चेत आली आहे. पूजा बत्रा सर्वात जास्त चर्चेत आली ते अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या नात्यामुळे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारमुळेच पूजाचे लग्न मोडले गेले आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय आणि पूजा मॉडेलिंगच्या काळात एकमेकांच्या खूप जवळ होते. याच कारणामुळे तिचं लग्न मोडल्याचे म्हटले जाते. मात्र, अक्षयला जेव्हा स्टारडम मिळाले तेव्हा पूजा आणि अक्षय याच्या नात्यात दुरावा येत दोघे दोघांनी एकमेकांपासून दुरावले. यासह पूजा हिचा घटस्फोट होण्यास तिचा पती देखील कारणीभूत असल्याचे बोलले जाते. कारण, तो पूजाला आई होण्यासाठी जबरदस्ती करत होता आणि पूजाला ते मान्य नव्हते.
Pooja Batra Birthday: अक्षय कुमारमुळे मोडले होते पूजा बत्राचे लग्न, 45 व्या वर्षी केलं दुसरं लग्न
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -