ताजी बातमी ऑनलाईन टीम
बिबट्या वन्य प्राण्यांचे कातडे,सांभर वन्य प्राण्यांचे दोन शिंगे आणि खवल्या मांजर यांचे १८ किलो ग्रॅम खवले असा २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिरज येथील पोस्ट ऑफिस जवळील जकात नाक्यासमोर एक इसम हा वन्य प्राण्यांच्या कातड्याची तस्करी करणेसाठी येणार आहे अशी खात्रीदायक बातमी ही महात्मा गांधी पोलीसांना मिळाली.सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक वनक्षेत्रपाल युवराज पाटील आणि त्यांचा स्टाफ तसेच महात्मा गांधी पोलीस चौकीचा स्टाफ, हे मिरज पोस्ट ऑफिस जुना जकात नाका येथे पोहोचले. त्या ठिकाणी अशोक सदाशिव कदम वय वर्ष 55 राहणार कदमवाडी पोस्ट फेजीवडे, ग्रामपंचायत हासणे ता.राधानगरी जि.कोल्हापूर याच्याकडे पांढऱ्या आणि दोन पिवळ्या रंगाची पोती आढळून आली.
त्याच्यावर संशय आल्याने ती पोती उघडून बघितली असता त्यामध्ये नऊ लाखाचे बिबट्याचे कातडे, एक लाख रुपयाची सांभर या वन्य प्राण्यांची दोन शिंगे, 18 लाख रुपयाची खवल्या मांजर त्याच्या अंगावरील खवल्या 18 किलोग्रॅम असे टोटल 28 लाख रुपयाचा मुद्देमाल वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त केला.आणि अशोक सदाशिव कदम याला अटक केली आहे. यावेळी कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील,अमोल आवळे, बसवराज कुदगोळ,प्रविण हुक्कीरे यांनी केली.तर याबाबत पुढील तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील हे करीत आहेत.