ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅसचा टँकर उलटला. बोरपाडळे येथे ही घटना घडली. अपघातानंतर गॅसला गळती लागली असून, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. आजूबाजूचा तीन किलोमीटरचा परिसर देखील निर्मनुष्य करण्यात आला आहे.
बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस टँकरचा अपघात होऊन तो पलटी झाला. त्यामुळे गॅस टँकरची टाकी लिकेज झाली. त्यामधून गॅस गळती चालू आहे. तरी वाठार ते कोडोली ते बोरपाडळे पुढे बोरपाडळे फाटा हा रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आला आहे. तसेच बोरपाडळे गाव परिसरात प्रवास करणे टाळावे, अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. डोईजड यांनी केले आहे.