Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानआता सहजी खरेदी करता येणार नाहीत मोबाईल सिम कार्ड्स

आता सहजी खरेदी करता येणार नाहीत मोबाईल सिम कार्ड्स

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतात मोबाईल सिम कार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सहज आहे. एकूण २१ कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र दाखविले कि मोबाईल सिम खरेदी करता येते. सिम कार्डच्या सहाय्याने होणारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्यावर केंद्र सरकारने सिम कार्ड खरेदी साठीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून येत्या १० ते १५ दिवसात नवे नियम लागू केले जाणार आहेत असे वृत्त आहे.



नव्या नियमावलीमुळे बनावट कागदपत्रे वापरून सिम खरेदी करण्यास लगाम बसणार आहे. सरकारने केवायसी प्रक्रिया कडक केली आहे. यामुळे सिम खरेदी साठी काही ठराविक कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. पूर्वी आधार, मतदार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, शस्त्र परवाना, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, एमपी किंवा एमएलए यांची चिट्ठी, पेंशनर कार्ड, पासपोर्ट, सीजीएचएस कार्ड, स्वातंत्रसैनिक कार्ड, शेतकरी पासबुक, फोटो क्रेडीट कार्ड या पैकी कोणतेही कागदपत्र दिले कि सिम खरेदी करता येत असे.

बनावट सिमच्या आधाराने आर्थिक फसवणूक आणि गुन्हेगारी कृत्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालली असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. त्यामुळे या पुढे सिम खरेदी साठी आधार कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड आणि वीज बिल इतकीच कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -