वेगवेगळ्या संकल्पनांवर तयार झालेले तीन चित्रपट या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. जान्हवी कपूर स्टारर ‘मिली’, सोनाक्षी सिन्हा हुमा कुरेशी स्टारर ‘डबल एक्सएल’आणि कतरिना कैफ स्टारर ‘फोन भूत’अशी ही चित्रपट आहेत. तिन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल करु शकलेले नाही. आज आपण मिली आणि फोन भूत या चित्रपटाचे चौथ्या दिवशीचे कलेक्शन जाणून घेणार आहोत.
चौथ्या दिवशी ‘मिली’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 50 लाख रुपयांची कमाई केली. त्याच वेळी, दुसऱ्या दिवशी 60 लाखांपर्यंत कमाई केली. तिसऱ्या दिवशी हा चित्रपट आपल्या खात्यात केवळ 64 लाख रुपये जमा करू शकला. वीकेंडला चित्रपटाचे आकडे असेच होते, त्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन यापेक्षा चांगले असण्याची अपेक्षा खूप कमी आहे.
‘फोन भूत’ने चौथ्या दिवशी किती कमाई केली?
बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या बाबतीत ‘फोन भूत’ चित्रपट देखील मागे आहे. त्यामुळे चित्रपटाचा खर्च वसूल करणे कठीण जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डेला ‘फोन भूत’चे कलेक्शन 2.05 कोटी रुपये होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.75 कोटींचा व्यवसाय केला आणि तिसऱ्या दिवशी हा आकडा 3.05 कोटींचा होता. त्याचवेळी चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ‘फोन भूत’चे सोमवारचे कलेक्शन अवघे 1.45कोटी रुपये झाले आहे.
असा आहे फोन भूत चित्रपट
‘फोन भूत’ 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. कतरिना कैफने मोठ्या ब्रेकनंतर या चित्रपटातून कमबॅक केले. ‘फोन भूत’ हा चित्रपट गुरमीत यांनी दिग्दर्शित केला असून तो देशभरात 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि परदेशात 500 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘फोन भूत’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये कतरिना भुताची भूमिका साकारत आहे, तर ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे लोक भूत पकडण्याच्या मिशनवर आहेत.
‘मिली’ हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे
जान्हवी कपूरचा चित्रपट मिली हा मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा रिमेक आहे. हिंदीमध्ये याचे दिग्दर्शन मुथुकुट्टी झेवियर यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात विकी कौशलचा भाऊ सनी कौशलही दिसला आहे.