Wednesday, August 6, 2025
Homeसांगलीसांगली : कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

सांगली : कवठेमहांकाळमध्ये झालेल्या ‘करेक्ट कार्यक्रमा’ने राष्ट्रवादी ‘अलर्ट मोड’वर; जुळवाजुळव सुरु

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.
खासदार संजयकाका पाटील सगळ्या घडामोडींच्या श्रेयाचे धनी असले, तरी खरी चर्चा ही पडद्यामागच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चीच झाली. याच धास्तीने राष्ट्रवादीचे नेतृत्व ‘अलर्ट’ झाले आहे. तासगाव कवठेमहांकाळची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जुळवाजुळव सुरू आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी सर्व नेत्यांच्या विरोधात जाऊन पॅनल उभे केले आणि एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर रोहित पाटील यांनी बांधलेली मोट विस्कळीत झाली. नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सलगी असणाऱ्या अशोक जाधव समर्थक दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष निवडीत पराभव पत्करावा लागला. लवकरच तासगाव नगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. यातही खासदार विरुद्ध आमदार गट एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. कवठेमहांकाळच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेतृत्व ‘अलर्ट’ झाले.

जयंत पाटील गट तासगावात दखलपात्र

पॅनल उभे केले आणि एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर रोहित पाटील यांनी बांधलेली मोट विस्कळीत झाली. नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सलगी असणाऱ्या अशोक जाधव समर्थक दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीला नगराध्यक्ष निवडीत पराभव पत्करावा लागला. लवकरच तासगाव नगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. यातही खासदार विरुद्ध आमदार गट एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -