Monday, August 4, 2025
Homeक्रीडाखेळात चढ-उतार येतच असतात! Sachin Tendulkar कडून टीम इंडियाची पाठराखण

खेळात चढ-उतार येतच असतात! Sachin Tendulkar कडून टीम इंडियाची पाठराखण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टी-20 विश्वचषक 2022 मधील सेमीफायनल सामन्यात टीम इडिंयाला इंग्लंडकडून लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागत आहे. भारतीय फलंदाजीपासून गोलंदाजी आणि नेतृत्त्वावर देखील मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. या सर्व टिकेदरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने भारतीय संघाला धीर दिला आहे. “खेळात चढ-उतार येतच असतात. कोणताही खेळाडू अपयशी होण्यासाठी खेळत नाही” असे म्हणत सचिनने टीम इंडियाची पाठराखण केली आहे.

भारतीय संघावर होत असेलेल्या टिकेदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने सेमीफायनलमधील पराभव निराशाजनक होता हे मान्य करत भारतीय संघाची पाठराखण केली आहे. तो म्हणाला “मला माहित आहे की इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना खूपच निराशाजनक होता. आपल्याला बोर्डावर चांगली टोटल ठेवता आली नाही हे मान्य करूया. हा सामना आपल्यासाठी अतिशय खडतर होता. हा एक वाईट आणि निराशाजनक पराभव होता. परंतु आपण जागतिक टी-20 क्रमवारीत क्रमांक 1 चा संघ देखील राहिलो आहोत.

“या स्थानावर एका रात्रीत पोहोचता येत नाही. त्यामुळे या एका सामन्यातील कामगिरीच्या आधारे आपण आपल्या संघाला जज करून नये. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात हे चढ-उतार येतच असतात. अशा वेळी आपण एकत्र असायला हवे” असे यावेळी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -