ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जयंती नाला परिसर ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेतात आढळलेल्या सहा गव्यांचा कळप अजूनही कोल्हापूरच्या वेशीवरच आहे. पंचगंगा नदीकाठावर भरपूर प्रमाणात गवत मिळाल्याने या गव्यांचा मुक्काम वाढल्याचा अंदाज आहे. शनिवारी दिवसभरात दोन गवे दिसल्याचा दावा कांही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
गव्यांचा हा कळप परतल्याचा दावा वनविभागाने शुक्रवारी दुपारी केला होता, मात्र शुक्रवारी सायंकाळीच त्यांचा वावर मामला परिसरात असल्याचे ठसे आढळल्याने वनावभागान गस्त वाढवली.
गुरुवारी रात्री वनविभागाच्या हातकणंगले येथील पथक परत गेले होते. शुक्रवारी आठजणांच्या संयुक्त रेस्क्यू टीमने हे गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली होती. मात्र हे गवे पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या रस्त्याने आल्या मार्गे परत गेलेले नाहीत. वनविभागाच्या पथकाला गव्यांच्या पावलांचे ठसे आढळल्याने हे गवे अजूनही कोल्हापूरच्याच वेशीवर असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.