Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली ; येथे लागलेल्या आगीत जनावरांची १३ शेड आगीच्या भक्षस्थानी

सांगली ; येथे लागलेल्या आगीत जनावरांची १३ शेड आगीच्या भक्षस्थानी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

खुजगाव ता. शिराळा येथे विद्युत वितरणच्या डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत, जनावरांची १३ शेड, चार जनावरे, शेती व संसारोपयोगी साहित्य मिळून २० लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जनावर जखमी झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खुजगाव येथील विद्युत वितरणच्या डीपी मध्ये दुपारी ५.३० वाजता शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये पांडुरंग बंडू सावंत, तुकाराम दादू सावंत, आनंदा दादू सावंत, शामराव नामदेव सावंत, संतोष शंकर सावंत, गुंडा तुकाराम सावंत, बाळकु यशवंत सावंत, दगडू यशवंत सावंत, निवृत्ती ज्ञानदेव सावंत, अशोक दगडू सावंत, संजय दगडू सावंत, पांडुरंग दगडू सावंत, संभाजी यशवंत सावंत यांच्या जनावरांच्या तेरा शेडांना आग लागली. प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांनी ३० जनावरांना सुखरूप बाहेर काढले मात्र शामराव नामदेव सावंत यांच्या ३ म्हैशी, १ रेडकू होरपळून मृत्यू पडले तर एक रेडकू जखमी झाले आहे.



डोळ्यासमोर लागलेली आग पाहून विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या निवृत्ती ज्ञानदेव सावंत यांना आगीची झळ बसली. ही आग एवढी भयानक होती की, विश्वास साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत राख रांगोळी झाली होती. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे भात, मका असे धान्य, शेत उपयोगी अवजारे, घरगुती साहित्य, पिंजर, गवत, लाकडे जळून खाक रपोता झाले. तर आगीत सर्व शेतकऱ्यांचे मिळून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -