Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगमनसेची नवी टॅगलाईन ! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video

मनसेची नवी टॅगलाईन ! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video


मुंबई – येत्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, पुणे महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसांपासून बैठकांची मालिका सुरू ठेवली आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुंबईत पहिलं भाषण होत आहे.


येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील
गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत. दुपारी ४ वाजता याठिकाणी मनसे कार्यकर्ते जमतील. या गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर भाष्य करत मनसेच्या ट्विटर हँडलवरून या मेळाव्याचा पहिला टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी जनभावना आहे असं कॅप्शन देण्यात आले आहे. त्यानंतर चला, हे चित्र बदलूया आपण महाराष्ट्राला पर्याय देऊ या अशी साद घालण्यात आली आहे. या टीझरमध्ये “चला पुन्हा नव्याने स्वप्न नवे पाहूया, नवमहाराष्ट्र घडवूया” अर्श टॅगलाईन देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -