ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबाबतची क्रेझ खूपच वाढत चालली आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला एक आठवडा पूर्ण झाला आहे. नवव्या दिवशी देखील चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करत जबरदस्त कमाई केली होती. आता नवव्या दिवशी देखील या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. या चित्रपटाने नवव्या दिवशी देखील चांगली कमाई केली आहे.
दृश्यम 2’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. या चित्रपटाने नवव्या दिवशी तब्बल 13.50-14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 140 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना स्टारर चित्रपट ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 100 कोटींचा आकडा पार करणारा हा वर्षातील पाचवा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट आणखी चांगली कमाई करेल असे सांगितले जात आहे. कलेक्शनच्या बाबतीत इतर चित्रपटांना दृश्यम 2 मागे टाकेल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 21.59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 11.87 कोटींचा गल्ला जमवला. ‘दृश्यम 2’ ने पाचव्या दिवशी 10.48 कोटी, सहाव्या दिवशी 9.55, सातव्या दिवशी 8.62 कोटींचे कलेक्शन जमा केले. आता चित्रपटाने आठव्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली आहे. आठव्या दिवशी या चित्रपटाने 7 कोटींची कमाई केली. तर नवव्या दिवशी या चित्रपटाने 13.50-14 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, अभिषेक पाठक दिग्दर्शित सस्पेन्स-क्राइम ड्रामा पुन्हा एकदा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. 7 वर्षानंतरही लोकांच्या मनातील विजय साळगावकरची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटात जुनी स्टारकास्ट तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, अजय देवगन हे आहेत. ‘दृश्यम 2’ हा चित्रपट यांच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मोहनलाल यांचा ‘दृश्यम’चित्रपट हा तेलगू, तमिळ आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. तसेच चित्रपटाचा दुसरा भागही मल्याळम भाषेमध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तो तेलगू आणि आता हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजनंतर या चित्रपटाने चांगले प्रदर्शन करत दमदार कमाई केली आहे.