कळंबा सुर्वेनगर येथे राहणाऱ्या एका वृदाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा श्रीरंग माने (वय 62, रा. सुर्वेनगर) असे आत्महत्या गृहस्थाचे नाव आहे. यांची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
याबाबत माहिती अशी मृत कृष्णा श्रीरंग माने हे सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते घरीच होते. सोमवारी घरी कोण नसल्याचे पाहून माने यांनी औषध प्राशन करून राहत्या घरी स्लॅपच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात येथे दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यु झाला होता. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याची नोंद करवीर पोलीस झाल्यावर रात्री उशिरा शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून असा परिवार आहे.