Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरमोबाईलवर कमी बोलण्यास सांगितल्याने अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी टाकून आत्महत्या

मोबाईलवर कमी बोलण्यास सांगितल्याने अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी टाकून आत्महत्या

कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यामध्ये शुल्लक कारणांवरून आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच आहे.करवीर तालुक्यातील कंदलगावमध्ये घरातील लोकांनी मोबाईलवर कमी बोलण्यास सांगितल्यानंतर राग आल्याने अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने आईला चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेची गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान, मुलीच्या आत्महत्येनंतर सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गोंधळ घातला. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने मित्रावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृत मुलीच्या पश्चात आई, वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. मृत अल्पवयीन मुलगी रविवारी घरातील लोक रागावल्यानंतर घरातून निघून गेली होती. यानंतर अपहरणाची तक्रार नोंद झाली होती. मुलीचा शोध घेत असतानाच वाडीची विहिर म्हणून प्रचलित असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलीच्या आत्महत्येनंतर आई वडिलांनी आक्रोश केला. प्रचंड मानसिक धक्का बसल्याने मृत मुलीची आई बेशुद्ध झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -