Saturday, July 26, 2025
Homeमनोरंजनशाही थाटात पार पडणार कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न

शाही थाटात पार पडणार कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न

गोविंदा नाम मेरा या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा होती.बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ हे 6 फेब्रुवारीला लग्न बंधणात अडकणार आहेत. विशेष म्हणजे हे देखील कतरिना आणि विकीप्रमाणेच राजस्थानमध्येच शाही थाटामध्ये लग्न करणार आहेत.कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, अजूनही यावर कियारा किंवा सिद्धार्थ यांनी काही भाष्य केले नाहीये.

राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न राॅयल पध्दतीने होणार आहे. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न तीन दिवस चालणार असून यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोविंदा नाम मेरा या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा होती. आता हे लग्न 6 फेब्रुवारीला होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -