नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाने हे वर्ष भरभराटीचं आणि आनंदात जावं यासाठी अनेक संकल्प केले आहेत. काही लोकांना आरोग्यासाठी व्यायाम किंवा योगा करायचा संकल्प केला आहे. तर कोणी देवदर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. जर तुमच्यावर आर्थिक संकट कोसळलं असेल तर तुम्ही शनिदेवा प्रसन्न करण्यासाठी ही कामं नक्की करा.
आज या वर्षातील पहिला शनिवार. हिंदू कॅलेंडरनुसार आजपासून माघ महिना सुरू झाला आहे. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. ग्रहांमध्ये शनिदेवाला न्यायाची देवता म्हटलं जातं. एखाद्यावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्याला चांगला वेळ येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण अशुभ दृष्टी असेल तर अब्जाधीशही कंगाल होतो. म्हणून अनेक जण शनिवारी शनिदेवाची पूजाअर्चा करतो आणि उपवास करतो. त्यामुळे त्या व्यक्तीवरील सर्व दु:ख नाहीसे होता असा विश्वास असतो. शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की, व्यक्तीच्या कर्मानुसार शनिदेव त्याला त्याचं फळ देतो. जर शनिदेव नाराज झाले तर त्याचा प्रकोप तुमचं आयुष्य उद्धवस्त करतो. त्यामुळे तुमच्यासोबत असं घडू नये म्हणून आणि शनिदेवाची कृपा वर्षभर राहावी म्हणून आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. शिवाय ज्या राशींवर शनीची साडेसाती चालू आहे, त्यांनाही या उपायांमुळे खूप फायदा होईल
‘हे’ सोपे उपाय शनिवारी करा
मडक्यात तीळ टाकून पिंपळाच्या झाडावर पाणी टाका आणि नतमस्तक झाल्यावर 7 वेळा प्रदक्षिणा करा.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
शनिवारी संध्याकाळी काळ्या उडदाचे दान करा.
हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा.
काळी उडीद पाण्यात वाहावी.
शनिवारी काळी गाय किंवा काळ्या कुत्र्याला भाकरी अर्पण करा. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात.
आज वर्षातील पहिला शनिवार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -