Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजन'भाईजानचा आदिलला एक फोन आणि…' राखी सावंतच्या नवऱ्याने लग्नाचा केला स्वीकार

‘भाईजानचा आदिलला एक फोन आणि…’ राखी सावंतच्या नवऱ्याने लग्नाचा केला स्वीकार

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.काही महिन्यांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड आदिल खानसोबत लग्न केल्याचा खुलासा केला आहे. कोर्ट मॅरेजचे फोटो व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केले. मात्र पती आदिल खानने लग्न झाल्याचे माध्यमांसमोर काही लवकर कबूल केले नाही. यामुळे राखी दु:खी झाली होती. आदिलने विश्वासघात केल्याचंही तिने पापाराझींसमोर रडत रडत सांगितलं. मात्र आता अचानक आदिलने लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आणि राखीचा जीव भांड्यात पडला. आश्चर्य म्हणजे आदिलचे मतपरिवर्तन करणारा दिसरा तिसरा कोणी नसून सलमान खान असल्याचं राखीने स्वत: सांगितलं.

इन्सटंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राखी आणि आदिल पापाराझींसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.राखी सांगते, ‘सलमान भाईचा आदिलला फोन आला होता. विचारा त्याला. आदिल सलमान भाईचा जावई आहे. त्यांनी फोन केला आणि आदिल ट्रॅकवर आला.’

सलमान खानने नक्की काय सांगितले असा प्रश्न पापराझींनी आदिलला विचारला, तेव्हा आदिल म्हणाला, ‘त्यांनी मला जे आहे ते स्वीकारायला सांगितले किंवा तसं नसेल तर नकार द्यायला सांगितला. पण जे आहे त्याला सामोरा जा जे खरे आहे ते सांग.’ यावर राखी म्हणते अरे बायकोसमोर तर कबूल केलंच पाहिजे ना.

तर आणखी एका व्हिडिओत आदिलने राखीची माफी मागितली आहे. तो म्हणतो मी हे लग्न स्वीकारतो राखी माझी पत्नी आहे आम्ही लग्न केले आहे. यानंतर आदिल हात जोडून राखीची माफी मागतो.राखी म्हणते, ‘सलमान भाईने माझे घर वाचवले. आदिलने सर्व काही मान्य केले आहे. यामुळे आता राखी भलतीच खूश आहे.

राखीने अलीकडे लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो अलीकडे व्हायरल झाले होते. यानंतर राखीने स्वत: लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केलेत. ७ महिन्यांपूर्वीच मी आदिल खान दुर्राणीशी लग्न केलं होतं. जुलै २०२२ मध्ये आम्ही कोर्ट मॅरेज आणि निकाह केला होता, असा दावा राखीने केला होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. मात्र आदिलने हे मानण्यास साफ नकार दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -