बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी राखीला अटक केली असून थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतच्या अटकेबाबत माहिती दिली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत सात महिन्यांपूर्वी लग्न केल्याची कबुली दिली होती. तसेच आपण धर्मातर करून आपलं माव फातिमा ठेवलं आहे असे तिने सांगितलं होते. मात्र आदिलने सुरुवातीला हे लग्न मान्य करण्यास नकार दिल्याने राखीला ढसाढसा रडताना सुद्धा आपण पाहिले होते. त्यांनतर आता तिच्यासमोर वेगळीच अडचण निर्माण झाली आहे.