ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडताना कारन 17 महिलांना जोरदार धडक दिली. यात 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी महिलांवर खासगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या महिला पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात होत्या. रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्यावेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कारने या महिलांना रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहन चालकाने रस्ता दुभाजक तोडून वाहनासह तेथून पळ काढला. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -