Tuesday, August 5, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाने रचला 'महारिकॉर्ड'; तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1 टीम

टीम इंडियाने रचला ‘महारिकॉर्ड’; तिन्ही फॉरमॅटमध्ये बनली नंबर 1 टीम

टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-1 टीम बनली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला.आज जाहीर झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडियाने यातही नंबर 1 स्थान पटकावले आहे. रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 ठरला आहे.

सध्या टी-20 संघाचा कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे. वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ 111 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. इंग्लंड 106 गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड 100 गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका 85 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

2023 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. प्रथम श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका जिंकली. त्यानंतर न्यूझीलंडसोबतची मालिका जिंकली. तसेच नुकत्याच झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन दिवसांत संपवत सामना खिशात टाकला होता.

दोन्ही संघात दुसरी कसोटी १९ फेब्रुवारीपासून दिल्लीत होणार आहे. वनडे आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.

अश्विनने कसोटी गोलंदाजी गाठले दुसरे स्थान

नागपूर कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या अप्रतिम फिरकी जोडीने सामना गाजवला होता.

ऑस्ट्रोेलियाच्या या कसोटी सामन्यात दोघांनी मिळून एकूण 15 विकेट घेतल्या. त्यानंतर आता अश्विनने 846 रेटिंग गुणांसह ICC च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून दुसरे स्थान पटकावले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -