Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरशिवसेना नेते केदार दिघे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर

शिवसेना नेते केदार दिघे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत आनंद दिघे यांचे उत्तराधिकारी आणि ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) केदार दिघे रविवारी (दि. 26) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शिवाजी पेठेतील फिरंगाई देवीच्या मंदिरासाठी पन्नास लाख रूपयांच्या निधीची घोषणा करणार आहेत. सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते संभाजीनगर पेट्रोलपंपाजवळील सुधाकर जोशी नगर येथे सायंकाळी 6 वाजता शिवशक्ती-भीमशक्ती शाखेचे उद्घाटन करणार आहेत. ही माहिती शिवसेना (ठाकरे गट) शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिली. या कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, प्रज्ञा उत्तुरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे इंगवले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -