ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावानजीक टँक्टर पलटी होऊन टँक्टरखाली सापडल्याने शाहुवाडी तालुक्यातील परळी येथील विठ्ठल धोंडीराम गुरव यांचा जागीच अपघाती मृत्यू झाला. याबाबत पन्हाळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
विठ्ठल गुरव हे अनेक वर्षापासून शाहु मार्केट यार्डात भाजी विभागात हमालीचे काम करत होते.. तसेच परळी येथे त्यांचे ऊसाचे गुऱ्हाळघर आहे. ऊसाचा हंगाम अंतिम टप्यात आला असल्याने गाळपासाठी ऊस आणण्यासाठी ते कागलकडे जाण्यासाठी पहाटे गावातून निघाले होते. त्यांच्या सोबत गावातीलच संजय ज्ञानू पाटील हे देखील होते.
टँक्टर पहाटे उत्रे गावाजवळ येताच त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व टँक्टर थेट मक्याच्या शेतात जाऊन उलटला. टँक्टरखाली विठ्ठल गुरव हे सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संजय पाटील हे जखमी झाले.पन्हाळा पोलीसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Kolhapur : ट्रॅक्टर खाली सापडून एकाचा मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -