मुरगूड शहराच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या शहरातील ‘त्या’ बोगस डॉक्टराला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला.यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या बोगस डॉक्टरच्या विरोधात घोषणा देत नागरिकांचा मोर्चा एसटी स्टँड मुख्य बाजारपेठ मार्गे पोलिस स्टेशनला आला. यावेळी मागण्यांचे निवेदन नागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांना दिले. दरम्यान, त्या अश्लील क्लिप आणि निनावी पत्रे पाठवणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी ही यावेळी केली.
शहरातील एका बोगस डॉक्टरने आपल्या लाघवी बोलण्याने दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले तसेच याचे व्हिडीओ चित्रीकरण ही केले. या क्लिप व्हायरल झाल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले होते त्यातून आजचा हा निषेध मोर्चा निघाला.
निवेदनात संशयित बोगस डॉक्टर आुयर्वेदिक वैद्य म्हणवणारा दत्तात्रय कदम हा असल्याचे म्हटले आहे. पोलिस स्टेशनवर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी तो मुख्य गेटवरच अडवला. यावेळी उद्योगपती जोतिराम सूर्यवंशी यांनी या नराधम डॉक्टरामुळे शहराची मोठी बदनामी झाली असल्याचे सांगून पोलिसांनी तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतः फिर्यादी व्हावे आणि या प्रकरणाची तक्रार दाखल करून त्या बोगस डॉक्टरला अटक करावी, अशी मागणी केली.
तर माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी त्या डॉक्टरने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले असून, इतके होऊन तो दवाखाना सुरू आहे. आपल्या कर्मचाऱ्याद्वारी उपचार सुरू ठेवले आहेत. पोलिसांनी तत्काळ तो दवाखाना बंद करून त्या भोंदूला अटक करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल, असे सांगितले.
यावेळी नागरिकांनी निवेदन, त्यासोबत व्हायरल झालेले फोटो, नागरिकांना आलेली निनावी पत्रे पोलिस स्टेशनमध्ये सादर केले. मोर्चावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बाजारपेठेमध्ये असलेल्या त्या डॉक्टरच्या घराजवळ मोठा बंदोबस्त लावला होता.
तक्रार देण्यास महिलांनी पुढे यावे –
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे म्हणाले, या प्रकारची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली होती. वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये बोगस डॉक्टरचे नाव नव्हते, त्यामुळे कारवाई करताना अडचण येत होती; पण लोकभावना लक्षात घेऊन मिळालेल्या निवेदनाद्वारे आपण बोगस डॉक्टरवर कारवाई करतो; पण त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी महिलांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पूर्णपणे संरक्षण देऊ. त्यांनी पोलिस स्टेशनला न येता पोलिस घरी जाऊन जबाब घेतील.
त्या’ बोगस डॉक्टरवर तत्काळ कारवाई करा, नागरिकांचा मुरगूड पोलिस ठाण्यावर मोर्चा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -