शेती भूमापन करण्यासाठी आलेले आलेल्या एक कर्मचारी तोल जाऊन विहिरीत पडला आहे. रुई तालुका हातकणंगले येथे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन तास संबंधित कर्मचाऱ्याला विहिरीमध्ये सोडण्याचे काम सुरू आहे परंतु अद्यापही त्याला यश आले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी रुई येथे गावालतच असलेल्या शेतजमीन मोजण्यासाठी कुंभोज येथील भूमापन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आले होते. भूमापन करत पायवाटेने जात असताना संबंधित कर्मचाऱ्याला ठेच लागली व त्याचा तोल जाऊन तो विहिरीमध्ये पडला. विहिर प्रचंड खोल आहे व त्यामध्ये पाणीही आहे. काही नागरिकांनी विहिरीत उतरून शोधण्याचा प्रयत्न केला.
परंतु विहिरीमध्ये खाली मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा शोध लागलाच नाही.
सध्या शेतीपंपासाठी विजेचे भार नियमन सुरू आहे या भागामध्ये संध्याकाळीच वीजपुरवठा होणार असल्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यास अडचण येत आहे. दरम्यान भूमापन कार्यालयातील अधिकारी तसेच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.