सांगली कुपवाड येथील अमर (उर्फ गुट्ट्या) राजेंद्र जाधव या सराईत गुंडाचा पाठलाग करून धार धार शस्त्रांनी डोक्यात वर्मी घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन संशयितांना सोमवारी रात्री परजिल्ह्यातून अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ एप्रिल अखेर पोलीस कोठडीचे आदेश सूनाविली.
अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती कुपवाड पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. सराईत गुन्हेगार अमर जाधव याच्या खूनप्रकरणी विजय सुरेश जाधव (वय ३५, रा. राजहंस कॉलनी कुपवाड) चेतन उर्फ सागर राजू जाधव (वय २४ रा. वडर कॉलनी सांगली) यांना सोमवारी रात्री कुपवाड पोलिसांच्या पथकाने पर जिल्ह्यातून अटक केली.