Monday, July 28, 2025
Homeसांगलीसांगलीत माय-लेकीचा निर्घृण खून! पाेलिस तपास सुरु

सांगलीत माय-लेकीचा निर्घृण खून! पाेलिस तपास सुरु

कोणीकोनूर (ता.जत ) येथे मायलेकींचा गळा आवळून खून केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. प्रियंका बिराप्पा बेळुंखे (वय. ३२) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय.१३) असे हत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. दुहेरी हत्याकांडामुळे जत तालुका पुन्हा हदरला आहे. ही घटना (रविवार) रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडीस आली. हत्या कोणत्या कारणातून केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात मृत प्रियंकाचा पती बिराप्पा बेळुंखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे सदरची घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

या घटनेची माहिती पोलीस पाटील तानाजी पवार यांनी दूरध्वनीवरून उमदी पोलिस स्‍टेशनला दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट देऊन सविस्तर पंचनामा केला. आज (सोमवार) सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्राथमिक तपासात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -