इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे आयपीएलमध्ये तुफान फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. जवळपास सव्वा वर्षानंतर अजिंक्य रहाणेनं कमबॅक केलं आहे. रहाणे शेवटची कसोटी जानेवारी 2022 मध्ये खेळला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. 7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला 28 मे पर्यंत संघांची संख्या 17 वरून 15 करावी लागेल. त्यानंतर ॲशेस मालिका आहे. दरम्यान, शेवटच्या तीन कसोटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि सुरुवातीच्या दोन ॲशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने याआधी घोषणा केली होती. आस्ट्रेलिया संघामध्ये 17 खेळांडूंचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
अजिंक्य रहाणेचं दमदार पुनरागमन, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -