Sunday, August 3, 2025
Homeसांगलीमिरजेत दोन ठिकाणी घरफोडी

मिरजेत दोन ठिकाणी घरफोडी

मिरजेतील दत्त कॉलनी येथील सुभाष छलवादी व मालगाव रोड महादेव कॉलनी येथील अझरूद्दीन सय्यद यांच्या घरात चोरी झाली आहे. छलवादी यांचा ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल व सय्यद यांचा ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असून दोघांनीही मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुभाष छलवादी यांच्या घरातील सर्वजण पाहुण्यांच्या कार्यक्रमासाठी म्हणून बाहेर गेले होते तर सुभाष छलवादी हे सांगलीला एका कंपनीत नोकरीसाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावून गेले. कामावरून घरी परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांना संशय आल्याने त्यांनी घरात गेल्यानंतर घरातील तिजोरीचे कपाट उघडे दिसले. यावेळी तिजोरीतील ३५ हजार रूपये रोख व एक तोळे सोने असा एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. छलवादी यांनी तिजोरीच्या कपाटाच्या किल्ल्या बाजूला ठेवल्या होत्या. त्याच किल्ल्या चोरट्यांनी घेवून कपाटातील डॉवर उघडून डॉवरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली आहे.

सुभाष छलवादी यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर महादेव कॉलनी मालगावरोड येथे राहणारे अझरूद्दीन कासीम सय्यद (वय ३५) हे घरातील सर्वजण बाहेर गावी गेले होते. बाहेर गावाहून आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. सय्यद हे घरात प्रवेश केला असता घरातील वस्तू विस्कटलेले दिसले. तर कपाटात असलेले रोख ६ हजार रूपये तसेच सोन्या-चांदीचे दागिने लंपास झाले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने असा एकूण ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सय्यद तसेच छलवादी या दोघांनीही मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -