Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनमेट गालामध्ये प्रियांका चोप्राने घातलेला डायमंड नेकलेस पाहिलात का ? किंमत ऐकाल

मेट गालामध्ये प्रियांका चोप्राने घातलेला डायमंड नेकलेस पाहिलात का ? किंमत ऐकाल

प्रियांका चोप्रा हे ग्लिट्झ आणि ग्लॅमरसाठी नवीन नाव नाही. अभिनेत्री तिच्या जबरदस्त व्यक्तीमत्वामुळे अनेकदा चर्चेत असते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्येही ठसा उमटवला असून प्रियांका आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या प्रियांकाचा मेट गाला इव्हेंट 2023 चा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रियांकाने पती निक जोनाससह ट्विनिंग केले होते. प्रियांकाने काळ्या रंगाचा व्हॅलेंटिनो थाय-हाय स्लिट गाऊन घातला होता. मात्र तिच्या ड्रेसपेक्षाही सर्वांच्या नजरा तिच्या हिऱ्याच्या नेकलेसवर खिळल्या होत्या.मेट गाला 2023 मध्ये ग्लोबल आयकॉन असणाऱ्या प्रियांकाने 11.6-कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. हा स्टेटमेंट पीस बुल्गारीचा आहे. पण त्या नेकलेसपेक्षाही, त्याच्या किंमतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हायरल होत असलेल्या ट्विटनुसार, प्रियांकाच्या या नेकलेसची किंमत 25 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे. “मेट गालानंतर प्रियंका चोप्राच्या 25 मिलियन डॉलर्सच्या बल्गारी नेकलेसचा लिलाव केला जाईल.” असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -