Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरराजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आता रशियन व इटालियन भाषेतही

राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आता रशियन व इटालियन भाषेतही

शाहू संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू चरित्राचे राजर्षी शाहू रशियन व इटालियन चरित्राचे अनुवाद ग्रंथ’ प्रकाशन सोहळा शनिवार, ६ मे रोजी हो‍णार आहे. शिवाजी विद्यापीठ येथील शाहू सिनेट सभागृहात सकाळी ११ वाजता हा साेहळा हो‍णार आहे.


‘शाहू चरित्राचे राजर्षी शाहू रशियन व इटालियन चरित्राचे अनुवाद ग्रंथ’ प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. डी. टी. शिर्के(कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अनुवाद ग्रंथाचे अनुवाद रशियन भाषेमध्ये डॉ. मेघा पानसरे व प्रा. तत्याना बीकवा आणि इटालियनमध्ये डॉ. अलेस्सांद्रा कोन्सोलारो यांनी केला आहे.


महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -