Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनबिग बॉस फेम अब्दु रोजिक अडचणीत

बिग बॉस फेम अब्दु रोजिक अडचणीत

बिग बॉस १६’ मधील स्पर्धक अब्दू रोजिकने मुंबईतील अंधेरी येथे ‘बुर्गीर’ हे आपले नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. मात्र या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अब्दु बंदूक हाती घेऊन दिसला.त्यामुळे त्याची तक्रार मुंबई पोलिसांत करण्यात आली आहे.बंदूक गोल्डन बॉयज सनी वाघचौरे आणि संजय गुर्जर यांच्या बॉडीगार्डने अब्दूला दिली होती. काही सेकंद ही बंदूक अब्दुजवळ होती.


या कार्यक्रमात फराह खान, सोनू सूद, अर्चना गौतम आणि साजित खान यांसारख्या अनेक कलाकार ही उपस्थित होते.वास्तविक, त्याचा पिस्तूल लोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळेच अब्दूच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या अंगरक्षकाने ही बंदूक अब्दू रोजिकला दिली होती. अंगरक्षकाकडे पिस्तूल ठेवण्याचा परवाना असला तरी. मात्र अब्दू रोजिकच्या हातात पिस्तूल पाहून लोकांनी प्रश्न उपस्थित केले. मुंबई पोलिसांत तक्रारील म्हणटले आहे की, जर चुकून त्या बंदुकीतील गोळीमुळे लोक जखमी झाले असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -