राज्यामधील बहुप्रतिक्षित असलेली 75 हजार पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मेगा भरतीला अखेर मुहूर्त सापडला असून राज्य शासनाचे जे काही 43 विभाग आहेत त्या अंतर्गत पावणे तीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून अनेक तरुण आणि तरुणी या भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता या मेगा भरतीचा एक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नेमके राज्य शासनाच्या माध्यमातून या भरतीची कशी तयारी किंवा नियोजन केले जात आहे याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.या कालावधीत होणार 75 हजार पदांची मेगा भरती
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणे नुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच एक जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या रिक्त पंचात्तर हजार पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे.
या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बऱ्याच तरुण-तरुणींची वयोमर्यादा संपुष्टात आल्यामुळे आता या मेगा भरती चा कृती आराखडा शासनाने तयार केला असून 15 ऑगस्ट पूर्वी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आवश्यक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.राज्यामध्ये सत्तांतर होऊन जेव्हा शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा त्यांनी मेगा भरतीची घोषणा केली होती व अगदी नियोजनबद्ध पध्दतीने 15 ऑगस्ट 2023 पूर्वी या तिची प्रक्रिया पूर्ण करण्याचे देखील जाहीर करण्यात आलेले होते. यासंदर्भात 20 ऑक्टोबर 2022 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गट ब, क आणि ड पद भरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला होता.
तर आपण राज्य शासनाच्या रिक्त पदे असलेल्या विभागांचा विचार केला तर यामध्ये महत्त्वपूर्ण असे महसूल, शालेय शिक्षण विभाग तसेच कृषी, वैद्यकीय शिक्षण तसेच ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा, महिला व बालकल्याण, राज्याचा सामाजिक न्याय विभाग व पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभाग आणि त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील रिक्त पदांमध्ये वाढ झालेली आहे.
सध्याचा विचार केला तर रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक आस्थापनाचा पदभार दिला गेल्या असल्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच कामांवर दिसून येत आहे. तसेच कोरोना कालावधीनंतर वित्त विभागाने पद भरती वरील लादलेले निर्बंध उठवल्याने देखील आता या भरतीस कोणतीही अडचण राहिलेले नाही.
एवढेच नाही तर आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यांमध्ये बेरोजगारांच्या संख्येत झालेली वाढ या दृष्टिकोनातून ही मेगा भरती सरकारला करणे भाग आहे. त्यामुळे आता या भरतीचा संपूर्ण कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.
अखेर मुहूर्त सापडला! ऑगस्ट महिन्याच्या ‘या’ तारखेपूर्वी राज्यात होणार 75 हजार पदांची मेगाभरती, असे राहील पदभरतीचे नियोजन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -