ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. उद्धव ठाकरे यांना राज्यासह देशपातळीवरील नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. असं असताना आज विधान परिषदेत सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन चांगलंच तू तू मैं मे बघायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
विधान परिषदेचं कामकाज सुरु होतं. सध्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान विधान परिषदेत आज चर्चा सुरु होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने आम्हाला लवकर जायचे आहे. याबाबत आम्ही विनंती केली होती”, असं सभापतींना सांगितलं. पण त्यांच्या या मुद्द्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला. “असं कसं चालेल? तुम्हाला जायचे असेल तर जावा”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
‘…तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका’, परब यांचा इशारा
प्रवीण दरेकर यांच्या भूमिकेवर अनिल परब यांनी महत्त्वाचा इशारा दिला. “सत्ताधारी पक्षाची अशी जर भूमिका असेल तर मग आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करु नका”, असा इशारा अनिल परब यांनी दिला. या दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही आमदार खाली बसूनच बोलले की, “नको आम्हाला तुमचे सहकार्य.” यावर अनिल परब यांनी वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावरुन अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात ‘तू तू मैं मे’
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -