Friday, February 7, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाची हारकीरी, वेस्ट इंडिजचा 4 धावांनी विजय!

टीम इंडियाची हारकीरी, वेस्ट इंडिजचा 4 धावांनी विजय!

वेस्ट इंडिजने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाचे फलंदाज विंडिजच्या माऱ्यासमोर सपशेल अपयशी ठरले.  टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

टीम इंडियाकडून डेब्यूटंट तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावांच योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या निर्णायक क्षणी 19 रन्स करुन माघारी परतला. अक्षर पटेल याने 13, तर संजू सॅमसन याने 12 धावा केल्या. अर्शदीप सिंह 12 धावांवर रन आऊट झाला. या सहा जणांशिवाय इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सलामी जोडी सपेशल फ्लॉप ठरली. इशान किशन 6 आणि शुबमन गिल याने 3 धावा करुन मैदानाहबाहेरचा रस्ता धरला. कुलदीप यादव 3 रन्स केल्या. तर युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार दोघेही 1 धावेवर नाबाद राहिले, मात्र त्यांना विजय मिळवून देता आलं नाही.विंडिजकडून रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर आणि ओबेड मॅकॉय या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान त्याआधी विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली. चहलने विंडिजला या एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. चहलने मेयर्सला 1 आणि किंगला 28 धावांवर आऊट केलं. जे चार्ल्स याने 3 रन्स केल्या. निकोलस पूरन याने 41 रन्स जोडल्या. तर कॅप्टन रोवमेन पॉवेल याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. शिमरॉन हेटमायर 10 रन्स करुन आऊट झाला. तर रोमरियो शेफर्ड 4* आणि जेसन होल्डर 6 धावांवर नाबाद परतले.

टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -