ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर देशाला दिशा दाखवणारी नगरी आहे. ही छत्रपती शाहू महारांजांची नगरी आहे. शाहू महाराजांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. महाराजांनी सामान्यांसाठी सत्ता वापरण्याचा सल्ला दिला. ढोंगी विचारांना शाहू महाराजांनी थारा दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते कोल्हापूर येथील दसरा चौकात आयोजित निर्धार सभेत बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञानांचे अभिनंदन करतो. माजी पंतप्रधान जवाहलाल नेहरूंनी इस्रोची स्थापना केली. नेहरू ते मोदी अशा पंतप्रधानांमुळे या संस्थेला यश मिळाले आहे. पण एकीकडे भारत चंद्रावर गेला आहे, तर दुसरीकडे महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. कांद्यावर कर लावल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादकांनी संघर्ष केला पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले, अशी टीका त्यांनी मोदी सरकावर केली.
एकीकडे भारत चंद्रावर, पण दुसरीकडे देशात महागाईचा डोंगर :शरद पवार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -