ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारताने सध्या काही वर्षांपासून फिनटेक सेक्टरमध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवर भारत या इंडस्ट्रीमध्ये सर्वात पुढे आहे. युपीआयच्या माध्यमातून भारतात मोठा बदल होत आहे. युपीआय पेमेंटच्या माध्यमातून किरकोळच नाही तर मोठमोठे व्यवहार होत आहे. इतर देशांमध्ये सुद्धा युपीआय वापरासाठी करार करण्यात आला आहे. त्यात आणखी एक पाऊल पुढं टाकण्यात आले आहे. आता व्हाईट-लेबल युपीआय एटीएमचा श्रीगणेशा होत आहे. या सुविधेमुळे कार्डलेस कॅश विड्रॉल म्हणजे विना कार्ड पैसे काढता येतील. त्यासाठी युपीआय एटीएमचा फायदा होईल. या सुविधेमुळे डेबिट कार्डचे फसवणूक होणार नाही. कारण डेबिट कार्डची पैसे काढण्यासाठी गरज नाही. युपीआय पेमेंटच्या सहायाने रक्कम काढता येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने हे पाऊल उचलण्यात येत आहे.
झाला रेकॉर्ड
ऑगस्ट महिन्यात UPI ने उच्चांक गाठला. युपीआय व्यवहार या महिन्यात 10 अब्जाचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. जुलै महिन्यात युपीआय व्यवहाराचा आकडा 9.96 अब्जावर होता. युपीआय, डिजिटल पेमेंटमध्ये महत्वाचा भाग ठरला आहे. झटपट व्यवहारासाठी कोट्यवधी भारतीय युपीआयचा वापर करत आहे.
या कंपनीचा वाटा
हिताची पेमेंट सर्व्हिसेज, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या नवक्रांतीची सुरुवात होत आहे. त्यामुळे एटीएमवर जाताना तुम्हाला सोबत डेबिट कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुमच्याकडे स्मार्टफोन असला तर तुम्हाला एटीएममधून रक्कम काढता येईल.
कार्ड स्किमिंगचा धोका टळणार?
कार्डलेस कॅश विड्रॉलमुळे कार्ड स्किमिंगचा धोका कमी होईल. यामध्ये डेबिट वा क्रेडिट कार्डचा प्रत्यक्ष वापर होणार नाही. त्यामुळे कार्ड स्किमिंगसारखा फ्रॉड होणार नाही. कार्ड स्किमिंगच्या आधारे एटीएमवर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. डेबिट कार्ड एटीएममध्ये टाकल्यावर सायबर भामटे कार्ड क्रमांक आणि पिन चोरतात आणि खात्यातील रक्कमेवर हात साफ करतात.
UPI ATM : डेबिट कार्ड ठेवा घरीच, आले की देशातील पहिले युपीआय एटीएम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -