जत तालुक्यातील सिंदूर – बसर्गी हद्दीलगत पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणातून तिघांनी तरुणाचा दगडाने ठेचून करून केला. गंगाप्पा परापा मगदूम (वय 33) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.शुक्रवारी दुपारी ही घडली.
सिंदूर येथे दुपारी गंगाप्पा मगदूम व संशयित तिघांबरोबर पूर्ववैमनस्यातून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. चिडून तिघांनी गंगाप्पा यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. त्यानंतर ते पसार झाले. परिसरातील लोक जखमी गंगाप्पा यांना उपचारासाठी सांगली येथे नेत असतानाच त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. घटनेबाबत अद्याप पोलिसात नोंद झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत गंगाप्पा हे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहत होते. गतवर्षी संशयित आणि यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी गंगाप्पा आणि संशयितांमध्ये वाद झाला. संशयितांनी दगडाने मारहाण केली. काहीजणांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. गंगाप्पा हा जखमी अवस्थेत उपचारासाठी व पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना सिंदूर – बसर्गी हद्दीत संशयितांनी पुन्हा गंगाप्पाला अडविले आणि दगडाने मारहाण केली. यात गंगप्पाला अति रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी सांगलीला नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.दरम्यान, खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे करीत आहेत.