Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीहुपरीतील पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी शिवसेना-ठाकरे गटाची मागणी

हुपरीतील पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी शिवसेना-ठाकरे गटाची मागणी


हुपरी नगरपरिषदेकडून जाहीर केलेली सुधारित पाणीपट्टी वाढ दहा दिवसांत रद्द करावी अन्यथ कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शहर शिवसेना तसेच युवा सेना (उद्धव ठाकरे) गटाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे.


युवा सैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी प्रशासन अधिकारी | क्षितिज देसाई यांची भेट घेत हुपरी शहराची बिकट परिस्थिती सांगून | सुधारित पाणीपट्टी वाढ पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली. तसेच | कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी वाढ गैर असल्याचे नमूद केले व येत्या | दहा दिवसांत दरवाढ कमी न झाल्यास टाळे ठोकण्यासह तीव्र आंदोलनाचा | इशारा दिला आहे. यावेळी रघुनाथ नलवडे, भरत देसाई, राजेंद्र पाटील, अरुण गायकवाड, संजय वाईंगडे, विजय जाधव, प्रविण चौगुले, अवघडी भानसे, मिना जाधव, आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील | सर्व पक्षांनी या दरवाढीला जोरदार विरोध केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -