Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 10वी, 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 10वी, 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाने जाहीर केलेल्या तारखांमध्ये बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत.

 

तर दहावीच्या विदयार्थ्यांची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत पार पडणार आहे. या सर्व परीक्षा नऊ विभागीय मंडळामार्फत पार पडणार आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागांचा समावेश आहे. यासंदर्भातील माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

 

लेखी परीक्षा कधीपासून सुरु होणार?

 

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

 

प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधीपासून सुरु होणार?

 

बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

 

यासह दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान पार पडणार आहे.

 

सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आज (02 नोव्हेंबर 2023) ला उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -