मजरेवाडी येथून कृष्णानळ पाणी पुरवठा योजना आणि पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून इचलकरंजीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र कृष्णा नळपाणी योजनेच्या वितरण नलिकेला इचलकरंजी शहरात दोन-चार ठिकाणी गळती लागली आहे. ही गळती काढण्याच्या कामामुळे महानगरपालिका प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. मात्र गळतीमुळे महासत्ता चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रस्ता खराब होत चालला आहे.
इचलकरंजीचा पाणी प्रश्न कायमच चर्चेत राहिला आहे. कृष्णा योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे शहराच्या
पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होतो.
तर पंचगंगा नदी प्रदुषणामुळे उपसा पुरेसा केला जात नाही. शहराला दररोज ५४ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला शिरढोण ते टाकवडे दरम्यान वारंवार गळती लागत असल्याने सातत्याने पाणी
उपसा बंद ठेवला जातो. त्यामुळे शिरढोण ते टाकवडे दरम्यान नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली असून ती काही दिवसांपूर्वी वितरण नलिकेला जोडली त्यामुळे इचलकरंजी शहराला दिवसा आड पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल, अशी अपेक्षा होती. शिरढोण ते टाकवडे दरम्यान वितरण नलिकेला लागणारी गळती आता थांबली आहे.
मात्र, सध्या महासत्ता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्यावर तीन-चार ठिकाणी गळती लागली आहे. नव्याने लागलेल्या गळतीमुळे कृष्णा नदीतून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा केला जात नाही. सदरची गळती काढण्यात प्रशासनापुढे अनेक समस्या असून पाणी पुरवठ्यावरही विपरित परिणाम होणार आहे. मात्र गळतीमुळे
पंचगंगा प्रवाह पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावत चालली होती. त्यामुळे पंचगंगेतून पाणी उपसा बंद पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. पण धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंचगंगा नदी प्रवाहीत होत असून हळूहळू पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
रस्त्याची वाताहत होत असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच वाहने स्लीप होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.