सोशल मीडियावर शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या प्रेमप्रकरणाची खूप चर्चा होत असते. दोघांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करून आपल्या मनातील भाव सर्वांसमोर व्यक्त करत असतात.
मागील एका सामन्यात शुबमन गिल बाद झाल्यानंतर कॅमेरामॅनने साराची रिअॅक्शन टिपली होती. साराची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
शुबमन गिल मैदानात क्षेत्ररक्षण करत असला तर प्रेक्षक साराच्या नावाने आवाज देत असतात. यासर्व गोष्टींवरून दोघांमध्ये काहीतरी प्रकरण आहे हे निश्चित होतं. आता सोशल मीडियावर या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सारा तेंडुलकरने शुबमन गिलच्या गळ्याभोवती हात टाकून उभी आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल झाल्यामुळे परत एकदा त्याच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झालीय. परंतु थांबा, व्हायरल झालेला या दोघांचा फोटो खरा नाहिये. हो फोटो मॉर्फ केलेले आहे.
साराच्या खऱ्या फोटोमध्ये सारा आणि तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहेत. काही इंटरनेट युजर्सने अर्जुनच्या अंगावर गिलचा चेहरा लावून तो फोटो ऑनलाइन व्हायरल केला. दरम्यान काही दिवसांपासून लोकप्रिय सेलिब्रेटींचे फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे वैयक्तिक गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
नुकताच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर कतरिना कैफचा टॉवेल सीनचा फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आलाय. कतरिनाचा टॉवेलचा सीन हा टायगर-३ या आगामी चित्रपटाचा आहे. या प्रकारामुळे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्स( आधीचे ट्विटर) तसेच इस्टाग्रामला ताकीद दिलीय. असे फोटो तात्काळ इंटरनेटवरून हटवण्यात यावेत, अशा सुचना या सोशल मीडिया साईट्सला भारतीय माहिती प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत.