तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करुन त्रस्त होत असाल आणि तुम्ही एका चांगल्या प्लॅनच्या शोधात असाल, तर BSNL एक प्लान ऑफर करतेय. ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही 1 वर्षासाठी फ्रीमध्ये कॉलिंग करु शकता. टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त प्लॅनिषयी सतत स्पर्धा सुरु असते. एअरटेल असो, वोडाफोन असो किंवा बीएसएनएल का असे ना. सर्व कंपन्या आपल्या लिस्टमध्ये स्वस्त आणि चांगले बेनिफिट असणारे प्लॅन ठेवतात. जेणेकरुन ग्राहक दुसरकडे कुठे जाऊ शकणार नाहीत. अनेक ग्राहक छोट्या रिचार्जमध्ये खुश राहतात. तर असेही काही कस्टमर्स असतात की, जे या रिचार्जच्या कटकटीपासून मुक्तता मिळवू इच्छितात. अनेकांना वर्षभराचा प्लॅन आवडतो.
BSNL च्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने ग्राहकांसाठी 1551 रुपयांचा प्लान ऑफर केलाय. या प्लॅनमध्ये अनेक फायदे आहेत आणि ग्राहक ते एकदा रिचार्ज करू शकतात आणि संपूर्ण वर्षभर मोफत लाभ मिळवू शकतात.
1551 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे एकदा रिचार्ज केले की, संपूर्ण 1 वर्षाचे टेन्शन संपले. आपण इतर कंपन्यांच्या एका वर्षाच्या प्लॅनविषयी बोललो तर त्यांची किंमत 2000 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, BSNL खूप स्वस्त किंमतीत इतका लांब व्हलिडिटी असलेला प्लॅन ऑफर करते.
प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. आपण दररोज 2GB डेटाच्या हिशोबाने पाहिलं तर ग्राहकांना 730GB डेटा दिला जातो. विशेष म्हणजे प्लॅनमधील 2GB डेटाची डेली लिमिट संपल्यानंतरही इंटरनेट बंद होणार नाही आणि त्याचा स्पीड 40kbps इतका कमी होईल.
BSNL च्या या वर्षभर चालणाऱ्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. म्हणजे फक्त एक रिचार्ज आणि नंतर वर्षभर कॉलिंग. याशिवाय प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा फायदाही दिला जातो.