कोल्हापूर ; हुल्लडबाजी,मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्ह
शाहू स्टेडियम येथे के. एस. ए. चषक फुटबॉल स्पर्धेवेळी शनिवारी काही युवकांनी हुल्लडबाजी व मारहाण केली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनिल आमते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप सरनाईक व पराग हवालदार (दोघे रा. मंगळवारपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजता पीटीएम संघाने गोल मारल्यानंतर पीटीएम व शिवाजी तरुण मंडळाचे समर्थक यांनी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून एकमेकांना चिडवा चिडवी केली. संदीप व पराग या दोघांनी शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांना मारहाण केल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.