ताजी बातमी / ऑनलाईन टीम:
इचलकरंजीत आज मंगळवार दि. 26 रोजी फटाक्याच्या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्या- ची घटना घडली. ही घटना भरवस्तीत घडल्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठे भितीचे वातावरण पसरले होते.
येथील गावभाग परिसरात असणाऱ्या संपत माळकर यांच्या फटाक्याच्या दुकानाला ही आग लागली. संपत माळकर यांचे हे दूकान येथे खुप दिवसांपासून आहे. यामध्ये फटाक्या याचबरोबर रांगोळी इत्यादी साहित्याची विक्री ते करतात. काल सोमवारी रात्री माळकर यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. तर आज सकाळी या त्यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून माळकर यांना ही माहिती दिली.
यानंतर लगेचच महापालिकेच्या अग्निशमन जवानांना येथे पाचारण करून ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत माळकर यांच्या दुकानातील सुमारे दोन ते अडीच लाखाचे साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, भरवस्तीत असणाऱ्या या दुकानाला आग लागल्याने परिसरात मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले होते.