चोरीचे काही गुन्हे ऐकून सामान्य माणूस हैराणच होतो. चोरीचा असाच एक गुन्हा डोंबिवलीमध्ये उघड झाला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही डोक्यावरच हात मारून घ्याल. चोरांनी एक रुपयाही चोरला तर नाही, पण त्यांच्या कारनाम्यामुळे तब्बल 21 लाख रुपये जळून खाक झाले.चोरीच्या, गुन्ह्यांच्या विविध घटना कानावर समोर येत असतात. गुन्ह्याच्या अनेक कार्यपद्धतींबद्दल कानावर काहीबाही पडत असतं. पण त्यातील चोरीचे काही गुन्हे ऐकून सामान्य माणूस हैराणच होतो. चोरीचा असाच एक गुन्हा डोंबिवलीमध्ये उघड झाला आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही डोक्यावरच हात मारून घ्याल. चोरांनी एक रुपयाही चोरला तर नाही, पण त्यांच्या कारनाम्यामुळे तब्बल 21 लाख रुपये जळून खाक झाले.खरंतर चोरी करायला गेलेल्या चोरट्यांमुळे एटीएमला आग लागली, त्यात 21 लाख रुपये जळाले. इतकेच नाही चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरी केला. या घटनेचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरु केला आहे.चोरीच्या प्रयत्नात 21 लाख जळालेमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डोंबिवलीतील महात्मा फुले रोड येथे घडली. तेथे असलेल्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शनिवार,13 जानेवारीच्या मध्यरात्री या एटीएम मशीनणधील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ते आधी एटीएममध्ये घुसले आणि चोरीचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या गॅस कटरचा वापर सुरु केला.मात्र एटीएम मशीन कट करीत असताना त्यातील गॅसमुळे आणि उष्णतेमुळे एटीएम मशीनला अचानक आग लागली. आणि या आगीत मशीनमधील तब्बल 21 लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. आग लागताच चोरटे तिथून पळाले. मात्र चोरट्यांनी तेथे लावण्यात आलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेच, तसेच एटीएमचे अंतर्गत भागही खराब झाले. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. “एटीएम बूथचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम’च्या अधिकाऱ्याने दिलेल्या तपशिलांच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे,असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेने डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.