Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

इचलकरंजीत विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

इचलकरंजीत विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदी केलेल्या कापडाचे बिल देण्यास टाळाटाळ करण्यासह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शामसुंदर रामप्रसाद मानधनी (रा. कापड मार्केटमागे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने तक्रार दिली आहे.

सोने तारण कर्ज : नियम, कागदपत्रे, प्रक्रिया आणि बँकांचे व्याजदर माहिती | Gold Loan 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पिडीत महिला व त्यांचे पती यांचा पॉवरलूम व्यवसाय असून हे दाम्पत्य हा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्याकडून शामसुंदर मानधनी व त्यांचे भागीदार बसंत रामस्वरुप काबरा यांनी सन २०१९ मध्ये ५० लाख रुपये किंमतीचे कापड दिले होते. या रकमेपैकी अद्यापही मानधनी यांच्याकडून ६ लाख रुपये येणेबाकी आहे. या रकमेची पिडीत महिलेकडून सातत्याने मागणी केली जात असता ते देण्यास टाळाटाळ केली जात होती.

बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड: अप्लाय कसे करायचे, चार्जेस, कागदपत्रे | Bajaj Finserv EMI Card

११ फेब्रुवारी २०२४ रोजी बसंत कावरा यांनी पिडीत महिलेला मानधनी यांच्याकडे पैसे आहेत, तुम्ही त्यांच्या घरी जावा असे सांगितले. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी पिडीत महिला मानधनी यांच्या घरी गेली. त्यावेळी मानधनी याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली आहे.

माघ पौर्णिमेपासून ‘या’ राशींचे भाग्य खुलणार? ४ दिवसांनी लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो अपार पैसा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -